India tour to England : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आज (24 मे) जाहीर करण्यात आला. शुभमन गिलला कर्णधारपदी संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यानंतर भारतीय संघ नवीन कसोटी कर्णधाराच्या शोधात होता. संघ निवडीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक बीसीसीआय मुख्यालयात झाली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा  संघ

  • कर्णधार: शुभमन गिल
  • उपकर्णधार आणि यष्टीरक्षक: ऋषभ पंत
  • यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

भारताचा इंग्लंडमध्ये कसोटी रेकॉर्ड तितकासा चांगला नाही

इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर (1932-2022) 67 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी फक्त 9 कसोटी जिंकल्या आहेत, तर 36 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 22 सामने अनिर्णित राहिले. एमएस धोनीचा (2011-2014) इंग्लंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून सर्वात वाईट विक्रम होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडच्या भूमीवर 9 पैकी फक्त एक कसोटी जिंकली, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णित राहिला.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिली कसोटी: २०-२४ जून २०२५ - हेडिंग्ले, लीड्स
  • दुसरी कसोटी: २-६ जुलै २०२५ - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • तिसरी कसोटी: १०-१४ जुलै २०२५ - लॉर्ड्स, लंडन
  • चौथी कसोटी: २३-२७ जुलै २०२५ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • पाचवी कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट २०२५ - द ओव्हल, लंडन

इतर महत्वाच्या बातम्या