कानपूर : आपल्या अनोख्या शैलीमुळे अनेकांना कोड्यात पाडणारा चायनामन बॉलर कुलदीप यादवने धक्कादायक खुलासा केला आहे. "आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढा निराश झालो होतो की, आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता," असं कुलदीप यादवने सांगितलं.

'तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता'
कानपूरमध्ये बोलताना कुलदीप यादव म्हणाला की, "मला वयाच्या तेराव्या वर्षी 15 वर्षांखालील संघात खेळायचं होतं. निवड होण्यासाठी मी जीव तोडून मेहनत केली होती. परंतु यानंतरही निवड न झाल्याने मी फारच निराश झालो होतो. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचं निश्चित केलं होतं. पण निराशेच्या दिवसात वडिलांनी माझं मनधैर्य वाढवलं. त्यामुळे मी आणखी मेहनत करु शकलो.

चायनामन बॉलिंग स्टाईल नाही तर शिवी, संपूर्ण कहाणी


फास्ट बोलर बनण्याचं स्वप्न होतं : कुलदीप
"मजा-मस्तीसाठी मी शाळेत क्रिकेट खेळत असे. पण क्रिकेटमध्ये काहीतरी विशेष करावं, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती," असं कुलदीप यादव म्हणाला. तसंच क्रिकेट कारकीर्दीचं श्रेयही त्याने वडिलांना दिलं.

चायनामन बॉलिंग स्टाईल नाही तर शिवी, संपूर्ण कहाणी


"मी लहान असतानाच वडिलांनी मला कोचिंगसाठी पाठवलं. सुरुवातीच्या दिवसात फास्ट बॉलर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ट्रेनिंगला जात असे. मात्र माझं कौशल्य पाहून प्रशिक्षकांनी मला फिरकीचं ट्रेनिंग दिलं," असंही चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सांगितलं.

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

सोप्या शब्दात ‘चायनामन’ म्हणजे…
कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने बोटांऐवजी मनगटाने चेंडू वळवला, तर त्याला ‘चायनामन’ गोलंदाज म्हटलं जातं. चायनामन गोलंदाजाचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतल्या बाजूने वळतो, तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरच्या दिशेने वळतो.