नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून भारताचा युवा गोलंदाज आणि मुंबईकर शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. शार्दूलच्या जागी विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.
21 ऑक्टोबरपासून विंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतील पहिल्या दोन वन डेसाठी 14 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. पण ऐनवेळी दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरला या मालिकेला मुकावं लागणार आहे.
भारत वि. वेस्ट इंडिज वन डे मालिका
पहिला वन डे – 21 ऑक्टोबर, गुवाहटी
दुसरा वन डे – 24 ऑक्टोबर, विशाखापट्टणम
तिसरा वन डे – 27 ऑक्टोबर, पुणे
चौथा वन डे – 29 ऑक्टोबर, मुंबई
पाचवा वन डे – 1 नोव्हेंबर, तिरुवअनंतपुरम
विंडिजविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका झाल्यानंतर 4 ते 11 नोव्हेंबरदरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठीच संघाची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल. विंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल, जिथे 21 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका, त्यानंतर कसोटी मालिका आणि नंतर वन डे मालिका होईल. 18 जानेवारी 2019 पर्यंत भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल, त्यानंतर लगेच 23 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होईल.
विंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, लोकेश राहुल, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, उमेश यादव
विंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून शार्दूल ठाकूर बाहेर, उमेश यादवला संधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 06:33 PM (IST)
शार्दूलच्या जागी विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरपासून पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -