जमैका : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव ट्वेण्टी-20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. जमैकातील सामन्यात भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 9 गडी राखून विजय मिळवला.


वेस्ट इंडिजचा सलामीवीर इविन लेव्हिसन 62 चेंडूंमध्ये शतक लगावत नाबाद 125 धावांची खेळी केली. लेव्हिसने तब्बल 12 षटकार आणि 6 चौकार लगावले.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत आणि दिने कार्तिकच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत सहा बाद 190 धावा केल्या होत्या.

टी-20 मधील पराभवासह भारताचा हा कॅरेबियन दौरा संपला. यापूर्वी पाच सामन्यांची वन डे मालिका भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने खिशात घातली होती.

INDvsWI : विंडिजला विजयासाठी 190 धावांचं आव्हान