मुंबई : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेरॉम टेलरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. जेरॉम टेलरनं आपल्या तेरा वर्षांच्या कारकीर्दीतल्या 46 कसोटी सामन्यांमध्ये 130 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवलाय.


 
टेलरनं 20 जून 2003 साली श्रीलंकेविरुद्ध सामन्यातून कसोटी पदार्पण केलं होतं. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेलरनं आपल्या कारकीर्दीतला अखेरचा कसोटी सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 धावांत सहा विकेट्स ही टेलरची त्याच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी ठरली.

 
दुखापतीमुळे टेलरला 2009 ते 2014 अशी पाच वर्ष क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. टेलरच्या नावावर कसोटीत एक शतकही जमा आहे. 2008 साली न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टेलरनं 106 धावांची खेळी उभारली होती.