चंदीगड : डेव्हिस चषक लढतीत दक्षिण कोरियावरील विजयाचा आनंद भारतीय खेळाडूंनी साजरा केला, तो नृत्यासह. हरियाणा टेनिस असोसिएशनच्या ग्रास कोर्टवर लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णासह भारतीय संघाच्या शिलेदारांनी 'अफगाण जलेबी' या गाण्यावर ठेका धरला.

 

 

एरव्ही टेनिस टीममध्ये बेबनावाची चर्चाच जास्त रंगते, पण पेस आणि बोपण्णाचं हे नृत्य बोलकं ठरलं आहे. स्वत: लिअँडर पेसने या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

 

https://twitter.com/Leander/status/754614993312776192

 

दरम्यान, डेव्हिस चषकात आशिया-ओशनिया ग्रुप वन च्या लढतीत भारताने दक्षिण कोरियावर 4-1 असा विजय मिळवला. शनिवारी लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णा जोडीने भारताला डेव्हिस चषकाच्या वर्ल्ड ग्रुप प्लेऑफचं तिकीट मिळवून दिलं होतं.

 

 

त्यानंतर रोहन बोपण्णाने हाँग च्युंगवर 3-6, 6-4, 6-4 असा विजय मिळवून भारताला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. रोहन बोपण्णा तब्बल चार वर्षांनंतर डेव्हिस चषकाच्या पुरुष एकेरीचा सामना खेळला. भारताला दक्षिण कोरियावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची संधी होती. पण अखेरच्या लढतीत रामकुमार रामनाथनला पराभवाचा सामना करावा लागला. योन्ग क्यू लिमने रामकुमारवर 6-3, 4-6, 7-6 अशी मात केली.

 

पाहा व्हिडीओ