हेडलाईन्स: 1. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा मातोश्रीवर डिनर, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण ---------------------------------- 2. सैराट सरकारचा झिंगाट कारभार, विरोधकांचा टोला, तर सैराटमधून बाहेर या, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला ---------------------------------- 3. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून, पूर्वसंध्येच्या बैठकीला सर्वपक्षीयांची हजेरी, जीएसटीसह महत्त्वाच्या विधेयकांसाठी मोदी सरकार प्रयत्नशील ---------------------------------- 4. कर्जत बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या कारवाईत जात आडवी येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर राम शिंदेंसोबतचा तो फोटो आरोपीचा नसल्याचंही स्पष्टीकरण ---------------------------------- 5. मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईला मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळं खीळ, पावसाळ्यापर्यंत कारवाईला स्थगिती, नवी मुंबई बंदमधून भाजपची माघार ---------------------------------- 6. अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावर भीषण अपघात, जीप-कंटेनरच्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू, तर 9 जण गंभीर जखमी ---------------------------------- 7. पावसामुळं बेळगावमधील गोकाक धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, झुलता पूलावरुन धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी बेळगावात ---------------------------------- 8. अॅपलच्या आयफोन 7चा व्हिडिओ लीक, 256 जिबी मेमरी स्टोरेजचा पहिला आयफओन लवकरच बाजारात