VIDEO : संगकाराच्या जबरदस्त झेलची सोशल मीडियावर चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 03:57 PM (IST)
जमैका : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये अफलातून झेल टिपला. आजवर आपल्या फलंदाजीने विविध विक्रम रचणाऱ्या संघकाराने आता विकेटकीपिंगमधील कौशल्यही दाखवलं. सीएपीएलमध्ये जमैका तलावाज संघाकडून खेळताना संगकाराने त्रिनबॅगो नाईट रायडर्सच्या केवॉन कूपरचा यष्टीमागे झेल टिपला. संगकारा स्वत: डावखुरा असूनही उजव्या बाजूला शिताफीने झेपावून कॅच घेतला. 38 वर्षांच्या संगकाराची चपळाई पाहून सगळेच थक्क झाले. त्याच्या या कामगिरीची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. दरम्यान, जमैकाने हा सामना 36 धावांनी जिंकला. पाहा व्हिडीओ