मुंबई : मोबाईल हॅण्डसेटचं उत्पादन करणारा चिनी उद्योगसमूह व्हिवोने आयपीएलचा मुख्य पुरस्कर्ता म्हणून हक्क राखण्यात यश मिळवलं आहे. व्हिवोकडे पुढील पाच वर्षांपर्यंत आयपीएलचं टायटल स्पॉन्सरशिप असेल.
व्हिवोने आयपीएलच्या 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठीचे हक्क राखण्यासाठी तब्बल 2199 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. तर प्रतिस्पर्धी ओपो कंपनी 430 कोटी रुपयांच्या बोलीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी आयपीएलच्या मुख्य पुरस्कर्त्याचे हक्क व्हिवोकडेच होते. त्यासाठी व्हिवोने प्रत्येक वर्षाला 100 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलचा मुख्य पुरस्कर्ता हे हक्क राखण्यासाठी व्हिवोने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 554 टक्क्यांनी आपली बोली वाढवली होती.
बीसीसीआयने 31 जुलै 2022 पर्यंतच्या निविदा मागवल्या होत्या. व्हिवो दरवर्षी बीसीसीआयला सुमारे 440 कोटी रुपये देणार आहे, जी पहिल्यापेक्षा चारपट अधिक आहे.