नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानाबाहेर आपल्या ट्विटरच्या धडाकेबाज इनिंगसाठी ओळखला जातो. विरुने माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणला जन्मदिनाच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या.


यावेळी विरुने लक्ष्मणला शुभेच्छा देताना 'शोले'मधील गब्बर स्टाईल शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण शोलेमध्ये असता ,तर ''ये कलाई हमको दे दे लक्ष्मण'', असं गब्बर म्हणाला असता, अशा शब्दात विरुने षटकार लगावला.


https://twitter.com/virendersehwag/status/793317254263873537

विरुच्या ट्विटरवरुन दिलेल्या शुभेच्छा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावेळीही विरुने सहकारी खेळाडू लक्ष्मणला खास शैलीत शुभेच्छा दिल्या.