नवी दिल्ली : रिलायन्सने LYF सीरिजचा एफ 1 प्लस हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 99 रुपये ठेवली असून या फोनवर एका वर्षासाठी 4G सेवा मोफत मिळणार आहे.


रिलायन्सच्या जिओ सेवेची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. त्यातच हा स्मार्टफोन आणत रिलायन्सने स्मार्टफोन प्रेमींना दिवाळी गिफ्ट दिलं आहे.


या फोनमध्ये एचडी व्हॉईस कॉलसाठी खास सुविधा देण्यात आली आहे. स्नॅपडीलवर हा फोन सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे.


फीचर्स :




  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम

  • 1.6 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर

  • 3 GB रॅम, 32 GB स्टोरेज

  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा