नोटांसाठी लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्यांना सेहवागचं ट्वीट
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर, संपूर्ण देशभरात बँक आणि एटीएम सेंटर बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचे वीरेंद्र सेहवागने यापूर्वीच समर्थन केले आहे.
सेहवाग म्हणतो की, ''शहीद हनुमंथप्पा - 45 अंश सेल्सिअसमध्ये 35 फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सहा दिवस दबले होते. यानंतरही त्यांनी जगण्यासाठी मोठा संघर्ष केला. तेव्हा आपण आपल्या देशाला वाचवण्यासाठी काही तास या रांगेत नक्कीच उभे राहू शकतो''
पण बँकेबाहेर रांगेत उभे असलेल्यांना टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न विचारला आहे.
बँकांबाहेरच्या गर्दीमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रीया अनेकजण व्यक्त करत आहेत.
सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असले, तरी अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे.