मुंबई : नेहमीच आपल्या हटके ट्विट्सनी सर्वांना ट्रोल करणाऱ्या विरेंद्र सेहवागनं सौरव गांगुलीला ट्रोल केलं आहे. दोन पांडांचा फोटो ट्विट करत विरुनं दादा गांगुलीच्या सिक्सर लगावण्याच्या शैलीला लोकांसमोर ठेवलं आहे.


https://twitter.com/virendersehwag/status/827351220616646656

सेहवागनं दोन पांडांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यानं हटके कॅप्शनही दिलं आहे. यात दादा गांगुली आणि चायनीज गांगुली असा उल्लेख करत सेहवागनं सौरव गांगुलीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/827362396553486337

सेहवागनं ट्विट केलेल्या पांडांच्या फोटोतील एका पांडाचे डोळे मोठे आहेत, त्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळंही आहेत, जी एखाद्या चष्म्यासारखी दिसत आहेत. तर दुसऱ्या पांडाचे डोळे लहान आहेत. या पांडाचं उदाहरण देत सेहवागनं गांगुलीसोबत घालवलेल्या आठवणींना ट्विटमधून उजाळा दिला आहे.