विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्यात सर्वोत्कृष्ट कोण?
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे दोन दिग्गज फलंदाज समोरासमोर असतील. या दोघांनीह आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द एकत्रितपणे सुरु केली होती. पण या आगामी मालिकेत कोण विजयी होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराटने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत द्विशतक झळकावले होते. तसेच या मालिकेत वेस्ट इंडिजच्याच धर्तीवर त्यांच्यावर विजय मिळवला होता.
या दोघांच्यांच्याही विक्रमाची आकडेवारी पाहिल्यास विराट हा विल्यमसनपेक्षा वरचढ आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यात 85.20च्या सरासरीने 426 धावा ठोकल्या. यामध्ये दोन शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
विराट आणि विल्यमसनने 2010 साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराटने एकूण 45 कसोटी सामन्यात 45 च्याच सरासरीने 3245 धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या 12 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्यामुळे या आगामी मालिकेत दोघांमध्ये कोण वरचढ ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तर विल्यमसनने भारताविरुद्ध एकूण 7 कसोटी सामने खेळले असून यात 38.1च्या सरासरीने 496 धावा केल्या. यामध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे विल्यमसनने न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी क्रिकेटच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. न्यूझीलंडला या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.
विल्यमसनच्या मते विराटच्या खेळीत सातत्य असते.
तर दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आजपर्यंत 52 कसोटी सामने खेळले असून, यात 51च्या सरासरीने 4393 धावा ठोकल्या. विल्यमसनच्या या रेकॉर्डमध्ये 14 शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. विल्यमसनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील आकडेवारी पाहिल्यास विराटपेक्षा विल्यमसनचे पारडे जड दिसते. पण त्या तुलनेत विल्यमसनने विराटपेक्षा कसोटी सामने जास्त खेळले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -