तुम्हीच आधार कार्डातील चुका दुरुस्त करा!
सध्या कोणत्याही शासकीय कार्यालयात आधार कार्डचा वापर सक्तीचा झाला आहे. पण अनेकवेळा आधारकार्डातील लहान-लहान चुकांमुळे अतिशय महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील चुका दुरुस्त कशा करता येतील? याची माहिती देणार आहोत.
सर्वात शेवटी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला एजेन्सी सिलेक्ट करावी लागेल. यासाठी BPO service provider या ऑप्शनला सिलेक्ट करावे. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक कन्फर्मेशन मेसेज येईल, यानंतर काहीच आठवड्यात तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील नाव, पत्ता, आणि जन्म तारीख बदलायची असल्यास तुम्हाला याबाबतच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सोबत जोडावी लागेल.
UIDAI च्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही सिम्पल स्टेप्स फॉलो करावे लागतील. या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल. उदा. आधार कार्डावरील तुमच्या नावाचे स्पेलिंग दुरुस्त करायचे असेल, तर नावाच्या बॉक्सला क्लिक करून तिथे तुमच्या नावाचे योग्य स्पेलिंग नमुद कराल. यानंतर तिथे 'बदल' या ऑप्शन सिलेक्ट करावा.
जर तुमच्या आधार कार्डवर चुकीची माहिती किंवा स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला http://uidai.gov.in साईटवर जावे लागेल. UIDAI च्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला तमचे आधार कार्ड अपडेट करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP नंबरचा मेसेज येईल. हा OTP नंबर व्हेरिफाय केल्यानंतर UIDAI च्या वेबसाईटवर लॉग इन करता येईल.