मुंबई : धरमशाला वनडेत श्रीलंकेनं टीम इंडियाचा दारुण पराभव करत वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंह वगळता या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.


पराभवापेक्षाही भारतीय फलंदाज ज्या पद्धतीनं बाद झाले त्यावर भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले. अवघ्या 29 धावांवर भारतानं आपले 7 गडी गमावले होते. त्यानंतर धोनीनं एक बाजू लावून धरत धावसंख्या 100च्या पुढे नेली. पण श्रीलंकेनं 7 गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला.

या पराभवनंतर सोशल मीडियातून टीम इंडियावर बरीच टीकाही झाली. पण विराटची अनुपस्थिती आणि चर्चेत असलेलं लग्न यावरुनही ट्विपल्सनं टिप्पणी केली. किंबहुना सोशल मीडियावर त्याबाबतचे जोक व्हायरल होऊ लागले.

दरम्यान, सोशल मीडियात जोक व्हायरल होत असले तरी टीम इंडियाला कालच्या सामन्यात कोहलीची अनुपस्थिती नक्कीच जाणवली असणार.

टीम इंडियाच्या पराभवानंतर ट्विपल्सकडून विराटवर काही हटके ट्वीट



'एक जुना हिंदी सिनेमा आठवला. ज्यामध्ये हिरोचं लग्न सुरु असतं आणि दुसरीकडे डाकू पूर्ण गाव लुटून निघून जातात.' असं एका यूजरनं ट्वीट केलं आहे.



एका क्रिकेट चाहत्यांनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मोठी बातमी... विराट कोहलीचं लग्न रद्द झालं, बीसीसीआयनं स्पष्ट केलं की, कोहली संध्याकाळपर्यंत संघासोबत असेल.'



'टीम इंडियाचं स्कोअरकार्ड पाहताना विराट कोहली' असं म्हणत एका ट्विटर यूजरनं विराटचा हा फोटो शेअर केला.



'टीम इंडियाची अवस्था पाहिल्यानंतर इटलीतून धावणारा विराट' असं म्हणत एका यूजरनं हा फोटो ट्वीट केला. 



संबंधित बातम्या :

धरमशालेतली कामगिरी आमच्यासाठी डोळे उघडणारी : रोहित शर्मा

भारताचा दारुण पराभव, श्रीलंकेची मालिकेत 1-0 ने आघाडी