नवी दिल्ली: वेस्टइंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली भलताच मस्तीच्या मूड दिसून आला. घरात मजामस्ती करताना कोहलीनं आपले नवे फोटो ट्वीट केला आहे.


 

या फोटोमध्ये कोहलीनं आपल्या भाच्यासोबत मस्ती करताना दिसतो आहे. 'पार्टनर इन क्राईम' असं म्हणत कोहलीनं हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच कोहली म्हणतो की, "क्या प्यारा सा शैतान है ये"

 

आयपीएलनंतर जवळपास दीड महिन्यानंतर टीम इंडियाचे सीनियर खेळाडू हे जुलै महिन्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे.

 

मस्तीच्या मूडमध्ये दिसणारा विराट एका वेगळ्या लूकमध्ये दिसून आला. आपली जुनी हेअरस्टाइलही त्याने बदलली आहे. आता विराटनं क्रू कट हेअरस्टाइल केली आहे.

 


नुकतंच टीम इंडियाचे नवे कोच अनिल कुंबले यांची नियुक्ती करण्यात आले. त्यानंतर विराटनं ट्विटरवरुन त्यांचं स्वागतही केलं. विराट कोहली याआधी देखील अनिल कुंबळेंच्यासोबत खेळला आहे.