विराट कोहली होऊ शकतो चांगला पती
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही दिवसांत आपल्या खेळामुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही तो विशेष चर्चेत आहे. विराटच्या काही सवयी त्याला एक चांगला पती बनण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.
लग्नानंतर येणाऱ्या समस्यांवर विराट चांगल्या पद्धतीने मार्ग काढू शकतो. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतून हे अनेकवेळा दाखवून दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात तुफानी खेळ दाखवल्यानंतर विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल सोशल मीडियावरून बरेच संदेश व्हायरल झाले होते. यावेळी त्याने टीकाकारांना मर्यादा पाळण्याचा सल्ला देत फटकारलं होतं. यावरून त्याला महिलांबद्दलचा असलेला आदरही दिसून आला. हाच आदर त्याला एक चांगला पती होण्यासाठी मदत करू शकेल.
खेळकर वृत्तीचा विराट आयुष्यातही तितकाच खेळकर आहे. त्याच्या या स्वभावामुळे वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता कमी आहे.
विराट कोहली कुटुंबप्रिय व्यक्ती आहे. त्याच्या काही फोटोंवरून हे दिसूनही आलं आहे. तो आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना खूप मान देतो.
विराटच्या या गुणांमुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी कमी येतील.
त्याचा स्वभाव खेळकर आणि विनोदी असल्यामुळे त्याला लग्नानंतर हसतखेळत राहणं सोपं जाईल.
विराटच्या फीटनेसबद्दल सर्वांनाच माहिती आहे. विराटसारखा फीट पती मिळावा असं कुठल्याही मुलीला आवडेल.
विराट कोहलीला कुत्र्यांची खूप आवड आहे. प्राण्यावर प्रेम करणारी माणसं खूप प्रेमळ असतात.
विराट खूप चांगला फोटोग्राफर आहे. कुठल्याही मुलीला आपले चांगले फोटो काढणारा पती हवाच असेल.
विराटने काही दिवसांपूर्वी महेंद्रसिह धोनीच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोतून त्याला लहान मुलांची आवड असल्याचं समोर येत आहे. यामुळे लग्नानंतर मुलांची काळजी घेण्यात त्याचाही हात असणार हे नक्की.