'दीपा आणि ललिताचा सत्कार करा', सेहवागचं पंतप्रधान मोदींना साकडं
ललितानं महिलांच्या 3000 मी. स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवलं. तर सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत तिला 10व्या स्थानी समाधान मानावं लागलं.
'मी माननीय पंतप्रधान मोदी आणि सुरेश प्रभू यांना आग्रह करतो की, त्यांनी दीपा कर्माकर आणि ललिता बाबरला सन्मानित करावं. हे खेळाडू रिओमध्ये पदक पटकावू शकले नाही पण त्यांनी प्रत्येक अडचणींवर मात करुन आपल्या खेळानं सगळ्याचं हृदय जिंकलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या कामगिरीचं कौतुक करुन त्यांचा सत्कार करावा.' असं सेहवागनं ट्वीट केलं आहे.
टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं सरकारला आग्रह केला आहे की, रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि अॅथलीट ललिता बाबर यांचा सत्कार करावा
15 ऑगस्टच्या रात्री भारतीय अॅथलीट दीपा कर्माकरला प्रोत्साहन देणाऱ्या सेहवागनं पुन्हा एकदा ट्वीट करुन आपली 'मन की बात' पंतप्रधान मोदी आणि सुरेश प्रभूंसमोर मांडली आहे.
दीपानं वोल्ट प्रकारात अंतिम फेरीत धडक मारुन इतिहास रचला. तर अंतिम फेरीतही ती चौथ्या स्थानी होती.