हैदराबाद: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत द्विशतक ठोकलं. कोहली 204 धावा करुन तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर पायचित झाला.

मात्र कोहलीने जर रिद्धीमन साहाचं ऐकलं असतं, तर कदाचित तो आऊट झाला नसता.

कोहलीने द्विशतक ठोकल्यानंतर, तो आणखी मोठी खेळी करेल अशी आशा तमाम भारतीयांना होती. 126 व्या षटकात तैजुल इस्लामने टाकलेला चेंडू कोहलीच्या पायावर जाऊन आपटला. त्यानंतर बांगलादेशने पायचितची अपील केली.

VIDEO : अर्धशतकानंतर जाडेजाची ‘तलवारबाजी’

त्यावेळी विराटनेही स्वत:च आऊट असल्याचं समजलं आणि तो मैदान सोडत असल्याचं त्याच्या देहबोलीतून दिसलं. त्याचवेळी पंचांनीही त्याला आऊट दिलं, त्यामुळे विराट पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला.

मात्र नॉन स्ट्रायकर एण्डला उभा असलेल्या रिद्धीमान साहाने विराटला रिव्ह्यू घेण्यास सांगितलं. पण विराटने त्याकडे दुर्लक्ष करुन तो मैदानाबाहेर निघून गेला.

ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन

त्यानंतर रिप्लेमध्ये कोहलीच्या पॅडवर आदळलेला चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर जात असल्याचं दिसून आलं आणि मैदानावर एकच चुकचूक ऐकायल आली.

त्यामुळे जर कोहलीने रिद्धीमान साहाचं ऐकलं असतं, तर कदाचित कोहलीने आणखी विराट खेळी साकारली असती, अशी भावना प्रत्येकाची होती.

त्याआधीही कोहली 180 धावांवर होता, त्यावेळीही कोहलीला पायचित आऊट दिलं होतं. मात्र  रिद्धीमान साहाने त्यावेळीही कोहलीला आऊट नसल्याचं सांगून, डीआरएस घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पंचाचा निर्णय चुकीचा ठरला होता, त्यामुळेच कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली होती.

संबंधित बातम्या

VIDEO : अर्धशतकानंतर जाडेजाची ‘तलवारबाजी’

ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन

कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित

गंभीरची उचलबांगडी, रिषभ पंत दिल्लीचा कर्णधार