किक्रेटमध्ये आपल्या खेळीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे खेळाडू बिझनेसमध्येही तरबेज असल्याचे पाहायला मिळत आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत, जे मैदानावरचं नाही तर व्यावसायातही चौकार षटकार लगावताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत. हे क्रिकेटर्स ज्यांनी आपला व्यवसाय केवळ स्थापित केला नाही तर इतर स्टार्ट-अपमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.


विराट कोहली



टीम इंडियाचा कर्णधार केवळ स्वत:चा ब्रँड One8 आणि Wrogn सांभाळत नाही तर त्याने अनेक स्टार्टअप्समध्येही महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार विराटने सोशल मीडिया स्टार्टअप्स स्पोर्ट्स Sports Convo आणि Chisel Gyms यासह इतर अनेक स्टार्टअपमध्ये सुमारे 90 कोटींची गुंतवणूक केली आहे.


एम.एस.धोनी



अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये वारंवार दिसणार्‍या धोनीने बर्‍याच स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनी केवळ Cars24 आणि Khatabook च्या जाहिरातीच करत नाही तर मिस्टर कूलने त्यातही काही गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअप्समध्ये धोनीने किती गुंतवणूक केली याबद्दल माहिती सार्वजनिक केलेली नाही.


सचिन तेंडुलकर



क्रिकेटचा देव सचिननेही स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सचिनने हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी Smartron India मध्ये गुंतवणूक केली आहे.


हर्षा भोगले



क्रिकेट वर्ल्डचा प्रसिद्ध चेहरा आणि प्रसिद्ध होस्ट हर्षा भोगले यांनीही स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हर्षाने वित्तीय क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप ChqBook मध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यांनी किती रक्कम गुंतविली आहे हे सार्वजनिक नाही.


रॉबिन उथप्पा



बेंगळुरूस्थित क्रिकेटर रॉबिन उथप्पासुद्धा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यात मागे नाही. मीडिया रिपोर्टनुसार रॉबिनने आपल्या Caffeine Ventures कंपनीच्या माध्यमातून iTiffin आणि बेंगळुरू स्थित स्टार्टअप HealthEminds मध्ये गुंतवणूक केली आहे.


उमेश यादव



गोलंदाज उमेश यादवने कोलकाता येथील स्टार्टअप कंपनी Fashionove मध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅशन जगाशी संबंधित या स्टार्टअपमध्ये उमेशने 5 वर्षांपूर्वी 2015 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली.


युवराज सिंह



क्रिकेटर युवराज सिंगने आपल्या YouWeCan या उद्यमातून सौंदर्य आणि आरोग्य स्टार्टअप Vyomo मध्ये गुंतवणूक केली आहे. इतकेच नव्हे तर फोर्ब्सच्या वृत्तानुसार, युवराजने JetSetGo ही ट्रॅव्हल कंपनी, SportyBeans या मुलांचा क्रीडा कार्यक्रम, तसेच कार्टिसन, Cartisan आणि Healthian आणि पोषण क्षेत्रात काम करणाऱ्या Wellversed स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.