मुंबई : टीम इंडियाला साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडकडून हार स्वीकारावी लागली, मात्र कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या अव्वल कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट यावेळीही पहिल्या क्रमांकावर आहे.


विराटने साऊदम्प्टन कसोटीत 46 आणि 58 धावांच्या खेळी केल्या. या कामगिरीनंतर त्याच्या खात्यात आता 937 रेटिंग गुण झाले आहेत. कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत विराटची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विराटने इंग्लंड दौऱ्यातल्या आठ कसोटी डावांमध्ये 544 धावांचा रतीब घातला.

भारताचा चेतेश्वर पुजारा आयसीसीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर दाखल झाला आहे. मोहम्मद शमीनेही 19 वं स्थान मिळवलं आहे. जसप्रीत बुमराहने 37 वं स्थान राखलं आहे.

आयसीसीची कसोटी फलंदाजांची क्रमवारी

1. विराट कोहली
2. स्टीफन स्मिथ
3. केन विल्यमसन
4. डेव्हिड वॉर्नर
5. ज्यो रुट
6. चेतेश्वर पुजारा
7. दिनेश कानुरत्ने
8. दिनेश चंडीमल
9. डीन एल्गर
10. एडन मार्क्रम