टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार विराटचे नवे विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2016 01:08 PM (IST)
1
विराटने 154 धावांच्या खेळीने भारतीय भूमीवर 3000 धावांचा टप्पा पार केला. विराटने आपल्या गतीने माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही पिछाडीवर टाकलं आहे.
2
लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या 14 शतकांची बरोबरीही केली आहे.
3
एकदिवसीय क्रिकेटमधील विराटचं हे 26 वं शतक आहे. विराटने हे शतक अतिशय जलद केल्याने त्याच्या नावावर हा विक्रम नोंदवला आहे. विराटच्या या शतकी खेळीने त्याने एक दिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी धडक मारली आहे.
4
विराटने आपल्या शतकी खेळीसोबतच अनेक नवे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
5
मोहालीमध्ये रविवारी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला 7 विकेटसनी धूळ चारत, मालिकेत 2-1ने आघाडी मिळवली. या सामन्यात विराट कोहलीने 154 धावांची धडाकेबाज खेळी करत विजय खेचून आणला.