विराटची ICC च्या कसोटी क्रमवारीत पुन्हा घसरण
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 10:33 PM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक ठरली. दोन्ही डावांमध्ये मिळून त्याच्या नावावर केवळ 40 धावा जमा झाल्या आहेत. त्यामुळं कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली. विराटच्या खात्यात 847 गुण असून, पहिल्या स्थानावरच्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यात 936 गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं 869 गुणांसह चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विल्यमसननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डनेडिन कसोटीत शतक ठोकलं आहे. तर दुसरीकडं आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विननं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. संबंधित बातम्या ICC कसोटी क्रमवारीत विराट घसरला !