मुंबई: एकोणीस वर्षांचा एक उदयोन्मुख क्रिकेटर ते टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅट्साठीचा कर्णधार. विराट कोहलीमध्ये गेल्या गेल्या नऊ वर्षांत झालेल्या या परिवर्तनासाठी अनिल कुंबळेनं त्याला शाबासकी दिली आहे.

टीम इंडियाचा प्रशिक्षक असलेला कुंबळे गेली नऊ वर्षे तो विराट कोहलीला जवळून पाहात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं 19 वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकातली विराटची कामगिरी पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं त्याच्यावर यशस्वी बोली लावली होती. त्या वेळी कुंबळे हा बंगलोरकडूनच आयपीएलमध्ये खेळत होता. त्यामुळं कुंबळे गेली नऊ वर्षे विराटला जवळून पाहात आहे.

विराटच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करता येणार नाही, असं सांगून कुंबळे म्हणाला की, ‘तो अतिशय हुशार क्रिकेटर आहे. त्याच्या खेळाविषयीची समर्पित भावना कमालीची आहेच, पण सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी तो स्वत:ला ज्या पद्धतीनं प्रेरित करतो, त्यातून इतरांना खूप शिकण्यासारखं आहे.’ असंही कुंबळे म्हणाला.