मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत असून, या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी विराट जिममध्ये घाम गाळताना दिसतो आहे. त्यानं जिममधला आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

 

भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या कसोटी मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्तानं विराटनं आपली हेअरस्टाईलही बदलली आहे.

 


 

विराटनं हेअरस्टायलिस्ट अपेनी जॉर्जसह आपल्या नवा लूकचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच नव्या अवतारात विराट न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरेल.