अनिल कुंबळेची फुटबॉल बंदी विराटनं झुगारली?
विराटच्या हटके स्टाइलमुळे एकप्रकारे त्याची ओळख बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराटने असे काही करून दाखवले की, तुम्हालाही अश्चर्य वाटेल.
विराटची स्टाइलही वेगळी आहे. तो सतत हेअर स्टाइल बदलत असतो. कधीकधी तर तो उन्हाळ्यांच्या दिवसातही स्वेटर घातलेला दिसतो.
पण विराट फुटबॉलला खूप मिस करत असल्याने तो फुटबॉल शूज घालून आला होता.
विराट हा फुलबॉलचा चाहता असून तो युरो कपमध्ये जर्मनीच्या संघाला सपोर्ट करतो. यामुळेच विराटसाठी जर्मनीच्या फुटबॉल संघाचा कर्णधार टोनी क्रुसने आपली जर्सी त्याला भेट म्हणून पाठवली होती.
एवढेच नाही, तर विराट फुटसाल प्रीमिअर लीगचा ब्रँड अम्बेसिडर असून नुकतेच यासाठी त्याने ए.आर रेहमान सोबत गाणे गायले होते.
गेल्या 4 दिवसांपासून कोणताही खेळाडू फुटबॉल खेळताना दिसत नव्हता. नेट प्रॉक्टिसवेळी काहीजण गोलंदाजी तर काही फिल्डींगचा सराव करत होते.
प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी फुटबॉल खेळण्यास बंदी घातली होती पण तरीही विराट फुटबॉल शूज घालून आल्याने अश्चर्य व्यक्त होत होते.
या सरावावेळी विराटसोडून बाकीच्या सर्व खेळाडूंनी क्रिकेट शूज घातले होते. गोलंदाज स्पाइक्स शूजमध्ये तर फलंदाज बॅटिंग शूज घालून मैदानात उतरले होते.
क्रिकेट मैदानावरील सरावासाठी विराट चक्क फुटबॉलचे बूट घालून आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -