मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फिटनेस आणि लूक्सबाबत चांगलाच जागरुक आहे. मात्र कोहली पिण्याच्या पाण्यावरही शब्दशः 'पाण्यासारखा' खर्च करतो. विराट तब्बल सहाशे रुपये प्रतिलीटर दराने विकलं जाणारं पाणी पितो.


ऐकून आश्चर्य वाटेल, पण विराट कोहलीसाठी फ्रान्सहून एव्हिअन मिनरल वॉटर या ब्रँडचं पाणी मागवलं जातं. या ब्रँडच्या एक लिटर पाण्यासाठी थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल 600 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे दिवसाला सरासरी 2 लीटर पाणी धरलं, तर विराट कोहली महिन्याला पिण्याच्या पाण्यासाठी 36 हजार रुपये खर्च करतो.

महागड्या पाण्याचं वैशिष्ट्य काय?

1. वजन कमी करणं
2. ताण-तणावांपासून मुक्ती
3. त्वचा तजेलदार राखणं

दिवसभर एखादी व्यक्ती अन्नाचा कणही न खाता राहू शकते, मात्र पाण्याच्या थेंबाशिवाय कठीण असतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर प्रत्येकालाच तहानेनं व्याकुळ व्हायला होतं. त्यातच क्रीडापटूंना शरीराकडे अधिक लक्ष द्यावं लागत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने पाण्याचं महत्त्व किंचित जास्तच आहे.

पाण्यासोबतच विराट डाएट फूडकडेही लक्ष देतो. प्रोटिनयुक्त आहाराकडे कोहलीचा अधिक कल असतो. सॅलड, लँब मीट आणि सॅलमन मासा हे त्याच्या आहाराचा भाग आहेत. सामन्याच्या सरावाशिवाय जिममध्ये जाऊन विराट स्वतःला तंदुरुस्त राखण्याचे प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे दौऱ्यावर असताना त्याचा डाएटही आखलेला असतो.