मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. या सुट्टीत विराट एकदम मस्तीच्या मूडमध्ये आहे. नुकतंच एका मित्राच्या लग्नात विराट कोहली ऐश्वर्या रायच्या 'कजरा रे' गाण्यावर थिरकला.


सोशल मीडियावर विराटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 'बंटी और बबली' सिनेमातील ऐश्वर्याच्या 'कजरा रे' गाण्यावर विराट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ विराटच्या मित्राच्या लग्नातील आहे. विरुष्काच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या ह्या व्हिडीओमध्ये अनुष्काची आईदेखील दिसत आहे.


विराटने त्याचा मित्र गगन आणि मलिकाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्नाच्या पार्टीत अनुष्कालाही आमंत्रण होतं. पण काही कारणाने ती हजर राहू शकली नाही.

हा व्हिडीओ भारतीय टीम श्रीलंकेला रवाना होण्याच्या आधीचा आहे, कारण यात विराट कोहलीसोबत क्रिकेटर शिखर धवनी डान्स करताना दिसत आहे. शिखर धवन सध्या तिरंगी मालिकेसाठी लंकेत गेलेल्या भारतीय संघाचा सदस्य आहे.