मुंबई: भारतीय संघाचा आधारस्तंभ आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीत 4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
कसोटीत चार हजार धाव ठोकणारा विराट हा चौदावा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीनं 2016 या एका वर्षभरात वैयक्तिक एक हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. बीसीसीआयनं यासंदर्भात ट्विट करून कोहलीचं अभिनंदनही केलं आहे.
कोहलीनं 52 कसोटी सामन्यात 4000 धावा करुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे. सचिननं 58 कसोटीत 4000 धावा केल्या होत्या.
दरम्यान, 2016 या वर्षात 1000 धावा करणारा तो चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी अशी कामगिरी करणारे तीनही फंलदाज हे इंग्लंडचे आहेत. जेएम बेअरस्टो, जो रुट आणि अलेस्टर कूक यांनी या वर्षी 1000 धावा केल्या आहेत. पण यांच्यातही पहिला क्रमांक कोहलीचाच लागतो कारण की, बेअरस्टोनं 16 कसोटीत 26 डावामध्ये 1369 धावा केल्या आहेत. तर जो रुटनं 16 कसोटीत 19 डावात 1306 धावा केल्या आहेत. तर अलेस्टर कूकनं 11 कसोटीत 17 डावात 1008 धावा केल्या आहेत. तर या सगळ्यांना पाठी टाकत कोहलीनं 11 कसोटीत 14 डावात 1008 धावा केल्या आहेत.