मुंबई: टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं वानखेडे स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमधलं आपलं पंधरावं शतक साजरं केलं आणि भारताचा डाव सावरला.


सलामीवीर मुरली विजयनंही 136 धावांची खेळी केली होती. त्यामुळं टीम इंडिया 400 धावांचा पल्ला सहज पार करेल असं वाटत होतं. मात्र, जो रूट आणि आदिल रशीदच्या फिरकीसमोर भारताच्या मधल्या फळीची काहीशी पडझड झाली. सध्या विराट 104 धावांवर खेळत असून जयंत यादव त्याच्या साथीला आहे.



- LIVE: भारताला सातवा धक्का, रविंद्र जाडेजा 25 धावांवर बाद 

-LIVE: आर. अश्विन शून्यावर बाद, भारताला सहावा धक्का

– LIVE: भारताचा पाचवा गडी बाद, पार्थिव पटेल 15 धाव करुन माघारी


– LIVE: भारताला चौथा धक्का, करुण नायर 13 धावांवर बाद


– LIVE: मुंबईच्या मैदानातही कोहलीची संयमी खेळी, विराटनं झळकावलं अर्धशतक

– LIVE: भारताला तिसरा धक्का, शतकवीर मुरली विजय 136 धावांवर बाद

मुरली विजयचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं मुंबई कसोटीत इंग्लंडला अगदी चोख प्रत्युत्तर दिलं. विजयनं या वानखेडेवर 282 चेंडूंमध्ये दहा चौकार आणि तीन षटकारांसह 136 धावांची खेळी केली आणि मालिकेतलं आपलं दुसरं शतक साजरं केलं. तर काल 47 धावा फटकावणारा चेतेश्वर पुजारा आज दिवसाच्या पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनं मैदानावर पाय रोवून फलंदाजी केली. भारतानं आतापर्यंत 6 गडी गमावून 348 धावा केल्या आहेत. टीम इंडिया इग्लंडपेक्षा अजून 52 धावांनी पिछाडीवर आहे.

भारत-इंग्लडमधील मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर मुरली विजयनं शानदार शतकं झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचं 8वं शतक आहे. तर कर्णधार विराट कोहलीही अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.

लंचपर्यंत भारतानं 2 गडी गमावून 247 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 153 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं 31 षटकात एक गडी गमावून 101 धावा केल्या आहेत.

आज सकाळी सुरुवातीला चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद झाला.  त्यानंतर आलेल्या विराटनं संयमी फलंदाजी केली. दरम्यान, विराटनं कसोटीत 4000 धावांचा टप्पाही पार केला.