तेंडुलकर ते अझरूद्दीन, विराट कोहलीने सर्वांना मागे टाकलं
विराट कोहली हा परदेशात सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार बनला आहे. विराटच्या नावावर सध्या 5 शतकं आहेत जी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या बरोबरीची आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशतकांच्या बाबतीत सौरवनंतर लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा नंबर लागतो. गावसकर यांनी परदेशात 2 शतकं ठोकली आहेत.
सचिन आणि द्रविड पाठोपाठ माजी कर्णधार सौरव गांगुलीने 3 शतकं झळकावली आहेत.
विराट आणि अझरुद्दीन पाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी 4 शतकं झळकावली आहेत.
या दमदार शतकानंतर विराट कोहलीने टीम इंडियाच्या कर्णधारांचा विक्रमही मोडीत काढला आहे
भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान अँटिंगा येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावून टीम इंडियाला भक्कम स्थितीत पोहोचवलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 90 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 302 धावा केल्या आहेत.
परंतु कर्णधार महेंद्रसिंह धोनीना मात्र परदेशात एकही शतक ठोकता आलेलं नाही.
माजी कर्णधार कपिल देव आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी परदेशात शतक झळकावलं आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी एका शतकाची नोंद आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -