VIDEO: जेम्स अँडरसनच्या टीकेला कर्णधार विराटचं उत्तर!
एबीपी माझा वेब टीम | 16 Dec 2016 11:08 AM (IST)
मुंबई: भारताविरुद्ध चौथ्या कसोटीदरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं भारतीय कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीबबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त उसळत नाही. त्यामुळे कोहलीमधील कच्चे दुवे इथं अद्याप दिसून आलेले नाहीत. त्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून त्याच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण कोहलीनं अत्यंत प्रगल्भतेनं हाताळलं आणि अतिशय शांतपणे हे प्रकरण संपवलं. या संपूर्ण प्रकरणानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं या संपूर्ण प्रकरणाबाबत विराटला प्रश्न विचारला. विराटच्या दिलेल्या उत्तरानंतर सेहवागनंही कोहलीचं कौतुक केलं. पाहा विराटनं अँडरसनच्या टीकेला नेमकं काय उत्तर दिलं: VIDEO: