धरमशाला : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 20 वर्षांचा दुष्काळ संपवताना वर्ल्डकपमधील पाचव्या विजयाची नोंद केली. त्यामुळे  टीम इंडिया गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर विराजमान झाली असून सेमीफायनलच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. पुन्हा एकदा किंग कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध नांगर टाकताना विजयश्री खेचून आणली. सामना जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे सेलिब्रेशन सर्वांनी पाहिले. 


विराट आणि कोहली एकाच कारमध्ये 


दरम्यान, आज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली आणि रोहित दोघेही एकाच कारमधून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे कार पे चर्चा नेमकी कोणत्या विषयावर अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. 






कोहलीकडून अनेक वर्षांपासून आमच्यासाठी कामगिरी 


दुसरीकडे विराट कोहली विजयाचा शिल्पकार झाल्यानंतर रोहितने त्याच्या खेळीचे कौतुक केले. तो म्हणाला की, एका टप्प्यावर, आम्ही 300 प्लस पाहत होतो, पण श्रेय आमच्या गोलंदाजांना जाते. मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. दोघेही भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, परंतु आम्ही (रोहित आणि गिल) एकमेकांचे कौतुक करतो. आम्ही जिंकलो याचा आनंद आहे.






कोहलीसाठी फार काही बोलायचं नाही. त्यानं (कोहली) अनेक वर्षे आमच्यासाठी ही कामगिरी केली आहे. कामगिरी पार पाडण्यासाठी तो स्वत: उभारला. जेव्हा आम्ही मध्यंतरी काही विकेट गमावल्या तेव्हा कोहली आणि जडेजाने विजय खेचून आणला.   


कोहली आणि रोहित शर्माचा मैदानावरून एक व्हिडिओ व्हायरल 


दुसरीकडे, भारताने विश्वचषक 2023 मधील सलग पाचवा सामना न्यूझीलंडचा (Ind vs NZ) पराभव करून जिंकला. भारतीय संघाने हा सामना 4  विकेटने जिंकला. या सामन्यात असे अनेक क्षण होते जे चाहते कधीच विसरणार नाहीत. पहिल्या चेंडूवर शमीची विकेट असो की भारतीय फलंदाजांची शिस्तबद्ध फलंदाजी. पण त्याच दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माचा मैदानावरून एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.


प्रत्यक्षात व्हायरल झालेला व्हिडिओ न्यूझीलंडच्या डावाच्या 31व्या समाप्तीनंतरचा आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा बराच वेळ एखाद्या गोष्टीवर चर्चा करताना दिसत होते. जेव्हा दोघांमध्ये हा संवाद सुरू होता तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 160 धावा होती. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघेही 68-68 धावा करून खेळत होते.






आणि यादरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांशी एका गोष्टीवर असहमत दिसत होते. कदाचित फील्ड प्लेसमेंटबद्दलअसेल. मात्र, दोघांमध्ये काही वेळ बोलणे झाले आणि रोहित तेथून निघून गेला. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली होती की, विराट आणि रोहितमध्ये वाद झाला आहे आणि कदाचित दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही.






पण सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे एक चित्र समोर आले ज्याने अशा अफवांना पूर्णविराम दिला. या फोटोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांना मिठी मारताना दिसत होते. यावेळी दोघेही खूप आनंदी दिसत होते.