मुंबई : भारताच्या जसप्रीत बुमरानं अफगाणिस्तानच्या रशिद खानच्या साथीनं वन डे सामन्यांमधल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवलं आहे. त्या दोघांच्याही खात्यात समसमान ७८७ गुण आहेत.


अफगाणिस्तानच्या रशिदने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत 16 बळी घेतले होते. तर जसप्रीत बुमराने द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत 8 बळी घेतले.

याशिवाय भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल 21व्या स्थानावरुन थेट 7व्या स्थानी पोहचला आहे. तर कुलदीप यादवने देखील 47व्या स्थानावरुन 15 व्या स्थानी झेप घेतली आहे.

दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीच्या कसोटी आणि वन डेतल्या फलंदाजांच्या क्रमवारीत एकाचवेळी नऊशे गुणांचा टप्पा ओलांडणारा आजवरचा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं याआधी कसोटी आणि वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत एकाचवेळी नऊशे गुणांचा पल्ला ओलांडण्याचा पराक्रम गाजवला होता.

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट सध्या ९१२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर वन डे सामन्यांच्या क्रमवारीत त्यानं ९०९ गुणांसह अव्वल स्थान मिळवलं आहे.