तिरुवअनंतपुरम : टीम इंडियाने थिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडवर मात केली.

कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पत्रकार परिषदेत घेतली. विजयाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मात्र या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाने विराटला संताप अनावर झाला. धोनीच्या संघातील समावेशाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला होता.

विराट भडकला

लोक धोनीवरच टीका का करतात समजत नाही. मी 3 सामन्यात धावा केल्या नाही तर मला कुणीही काही बोलणार नाही, कारण मी 35 वर्षांचा नाही. मात्र त्याच्यासोबतच असं का? राजकोटमध्ये परिस्थिती अशी होती, की जर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला असता तर तोही धावा करु शकला नसता. धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दात विराटने सुनावलं.

https://twitter.com/Aarushiiiiiiiii/status/927965703218520064

धोनीऐवजी संघात युवा खेळाडूंना संधी द्यावी, असं मत माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केलं होतं. शिवाय अजित आगरकरनेही असंच म्हटलं होतं. त्यामुळे एका सामन्यात फलंदाजी न करु शकल्याने धोनीवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला होता, ज्याला कोहलीने सडेतोड उत्तर दिलं.

संबंधित बातम्या :

कोहली मारत होता, तेव्हा धोनी शांत का होता?: VVS लक्ष्मण


तिसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती मिळणार?


टी-20 मध्ये हे पाच खेळाडू धोनीची जागा घेऊ शकतात


धोनी युवा खेळाडूंवर कधीच अन्याय होऊ देणार नाही : सेहवाग


श्वास रोखले होते, कोहली सीमारेषेजवळ होता, धोनी सूत्रं सांभाळत होता!