पणजी : टीम इंडियाच सिक्सर किंग युवराज सिंह आणि मॉडेल-अभिनेत्री हेजल किच यांचा लग्नसोहळा हिंदू पद्धतीनुसार 2 डिसेंबर रोजी गोव्यात पार पडला. त्यांच्या लग्ना टीम इंडियाच कसोटी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासह अनेत स्टार उपस्थित होते. पण या लग्नाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विराट आणि अनुष्कार शर्माने युवराजच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले.

खरंतर विराटची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मा युवराजच्या लग्नाला उपस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु अनुष्काने लग्नाला फक्त हजेरी लावली नाही तर डान्सही केला.

अनुष्काने 'सेनोरिटा' गाण्यावर डान्स केला तर विराटने 'गंगनम स्टाईल'वर ठेका धरला. विराट आणि अनुष्काला नाचताना पाहून युवराज-हेजलला राहावलं नाही. ते दोघीही त्यांच्या सामील झाले. खीलमके नका

गोव्यातील सियोलिममधील टीजो वाटरफ्रण्ड रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर संध्याकाळी एका ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत विराट, अनुष्का शर्मा, रोहित शर्मासह अनेक मोठे स्टार उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Yuvihazel12/status/804863252043878401