मुंबई: भारताची पैलवान विनेश फोगटच्या मिशन ऑलिम्पिकची दुखापतीमुळं दुर्दैवी अखेर झाली. 48 किलो वजनी गटातील दुसऱ्या फेरीच्या कुस्तीत विनेशनं चीनच्या सुन यानानविरुद्ध दमदार सुरूवात केली. पण त्यानंतर विनेशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं विनेशला या लढतीतून माघार घ्यावी लागली.

 

त्याआधी विनेशनं सलामीच्या कुस्तीत रोमानियाच्या एमिलिया अलिनावर 11-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता.

 

दुसऱ्या फेरीच्या कुस्ती दरम्यान विनेशने चीनच्या युनानवर 1-0ने आघाडी मिळवली होती. पण युनाने तिला आपल्या डावामध्ये फसवले. यावेळी तिने कमावलेले दोन अंकही तिला गमवावे लागले. त्यातच तिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने, तिला माघार घ्यावी लागली. यानंतर पंचानी सुन यानानला विजयी घोषित केले.

 

यानंतर विनेशला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. या सामन्या दरम्यान विनेश दुखापतग्रस्त झाल्याने तिची प्रतिस्पर्धी युनानलाही दु: ख झाले.