पाहा, विनय कुमार जेव्हा भारताचा जॉन्टी ऱ्होड्स बनतो
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2018 10:16 AM (IST)
या शानदार क्षेत्ररक्षणानंतर विनय कुमारनेही जॉन्टी ऱ्होड्सला ट्वीट केलं.
नवी दिल्ली : 1992 सालच्या विश्वचषकातील क्षण तुम्हाला क्वचितच आठवत असतील, मात्र तो क्षण कुणीही विसरु शकत नाही, जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्सने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकला एका क्षणात धावबाद करुन माघारी पाठवलं होतं. क्रिकेटच्या मैदानात अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण खुप दुर्मिळपणे पाहायला मिळतं. मात्र भारतात सुरु असलेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने गुरकिरत सिंह मानला अशाच प्रकारे बाद केलं, ज्याने 1992 सालच्या विश्वचषकातील आठवणी ताज्या झाल्या. या शानदार क्षेत्ररक्षणानंतर विनय कुमारनेही जॉन्टी ऱ्होड्सला ट्वीट केलं. ''1992 सालच्या विश्वचषकात तुम्ही धावबाद केलेला क्षण किती तरी वेळा पाहिलाय आणि मलाही अशीच संधी यावी याची गेले कित्येक दिवस वाट पाहत होतो. अखेर ती संधी मिळाली, असं विनय कुमारने म्हटलं आहे. विनय कुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना जॉन्टी ऱ्होड्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते.