या सामन्यात विदर्भाच्या प्रभावी आक्रमणासमोर शेष भारत संघाचा पहिला डाव 390 धावांत आटोपला. विदर्भाकडून रजनीश गुरबानी चार, आदित्य सरवटेने तीन आणि उमेश यादवने दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी विदर्भाने आपला पहिला डाव सात बाद 800 धावांवर घोषित केला होता. त्यात वासिम जाफरने 286, अपूर्व वानखडेने नाबाद 157 आणि गणेश सतीशने 120 धावांचं योगदान दिलं होतं. विदर्भाने दुसऱ्या डावात बिनबाद 79 धावांची मजल मारली.
दरम्यान, यापूर्वीही इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला होता. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं होतं.
रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ होती. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली. त्यानंतर आता इराणी करंडकातही दणदणीत विजय मिळवला.
संबंधित बातम्या :