US Open 2021 : ब्रिटनच्या एम्मा रादुकानूनं 18 वर्षांच्या यूएस ओपन महिला सिंगल्सचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आहे. एम्मा रादुकानूनं अंतिम सामन्यात कॅनडाच्या लीलह फर्नांडिसला 6-4, 6-3 नं मात दिली. लीलह फर्नांडिसचा सरळ सेटमध्ये परभव करत एम्मानं यूएस ओपनचा किताब आपल्या नावे केला आहे. रादुकानू 53 वर्षांनी यूएस ओपनचा किताब जिंकणारी ब्रिटनची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. 


अंतिम सामन्यात रादुकानूनं अंतिम सामन्यात लीलहला वापसी करण्याची एकही संधी दिली नाही. लीलहनं पहिल्या सेटमध्ये रादुकानूसमोर मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. दुसऱ्या सेटमध्ये  रादुकानूनं धमाकेदार खेळी करत सामना अगदी सहज आपल्या खिशात घातला. 


यूएस ओपनच्या ट्विटर हँडलवरुन एम्मा रादुकानूला यूएस ओपनचा किताब जिंकल्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "53 वर्षांचा दुष्काळ संपला. रादुकानू 1968 नंतर यूएस ओपनचा किताब जिंकणारी पहिली ब्रिटिश महिला खेळाडू ठरली आहे."


रादुकानूनं गमावला नाही एकही सेट 


2021 च्या यूएस ओपनमध्ये रादुकानूनं उत्तम खेळी करत यूएस ओपनचा किताब पटकावला. संपूर्ण स्पर्धेत रादुकानूनं शानदार खेळी करत एकही सेट गमावला नाही. यूएस ओपन 2021 मध्ये रादुकानूनं एकूण 9 सामने खेळले आणि सर्व सामन्यांत सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यूएस ओपन 2021 मध्ये रादुकानूनं एकूण 18 सेट आपल्या नावे केले. 


दरम्यान, राहुकानूनं यूएस ओपन स्पर्धेत आपल्या खेळीनं सर्वांना थक्क केलंय. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच राहुकानू रॅकिंगमध्ये 150व्या क्रमांकावर होती. रादुकानूनं एवढ्या कमी रँकिंगसह इतिहास रचण्यात यशस्वी ठरली. फर्नांडिचं रॅकिंगमध्ये 73वी होती. तिनंही संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळी केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :