उरुग्वे आणि रशियाने गटात लागोपाठ दोन सामने जिंकून, बाद फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं होतं. त्या दोन संघांमधला सामना हा गटातला पहिला आणि दुसरा क्रमांक निश्चित करण्यासाठी होता.
या सामन्यात लुई सुआरेझने दहाव्या मिनिटाला उरुग्वेचं खातं उघडलं. मग रशियाच्या डेनिस चेरीशेव्हने स्वयंगोल करून उरुग्वेच्या खात्यात भर घातली.
उरुग्वेच्या एडिसन कावानीने एन्जुरी टाईममध्ये तिसरा गोल डागला. त्यामुळे उरुग्वेला 3-0 असा विजया साजरा करता आला.