मुंबई : अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज (गुरुवार) आयसीसीनं जाहीर केलं आहे. हा विश्वचषक न्यूझीलंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. ज्यामध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 जानेवारीला असणार आहे. अंडर 19 विश्वचषक पुढच्या वर्षी म्हणजेच 13 जानेवारी 2018 पासून असणार आहे. तर अंतिम सामना 3 फेब्रुवारी 2018ला होणार आहे.
अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ 'बी ग्रुप'मध्ये आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या संघाचा समावेश आहे. आयसीसीनं गुरुवारी यासंबंधीचं एक पत्रक काढून माहिती दिली.
या प्रमुख स्पर्धेपूर्वी भारताचे दोन सराव सामने असणार आहेत. पहिला सराव सामना 9 जानेवारीला द. आफ्रिकेविरुद्ध तर दुसरा सराव सामना 11 जानेवारीला केनियाविरुद्ध असणार आहे.
'ग्रुप ए'मध्ये वेस्टइंडिज, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि केनियाचा समावेश आहे.
तर 'ग्रुप सी'मध्ये कॅनडा, इंग्लंड आणि नामीबिया संघाचा समावेश आहे. तर 'डी ग्रुप'मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे.
14 जानेवारी - भारत वि. ऑस्ट्रेलिया
16 जानेवारी - भारत वि. पापुआ न्यू गिनी
19 जानेवारी - भारत वि. झिम्बाब्वे