पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

या लढतीतील पंचांवर पक्षपातणीपणाचा आरोप करण्यात आला आहे. किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी हा आरोप केला. ''अभिजित कटकेही माझाच आहे. त्याने कुस्ती चांगली केली, पण पंचांनी किरणच्या कुस्तीला न्याय दिला नाही'', असा आरोप काका पवार यांनी केला.

या लढतीत अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली. अभिजीतच्या विजयानंतर भूगावच्या मामासाहेब क्रीडानगरीत प्रेक्षकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

या लढतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह नेतेमंडळींचीही उपस्थिती होती. शरद पवार यांच्या हस्ते अभिजितला महाराष्ट्र केसरीची गदा देण्यात आली.

काका पवार काय म्हणाले?