मुंबई : आयपीएल 2016 च्या ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या हैदराबाद सनरायझर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा फलंदाज उमर अकमलनेही वॉर्नरला शुभेच्छा देण्याची संधी दवडली नाही. मात्र शुभेच्छांच्या ट्वीटमध्ये अकमलने घोळ घातला.

 

 
डेव्हिड वॉर्नर आणि टीम हैदराबाद सनरायझर्सला अकमलने शुभेच्छा दिल्या खऱ्या, मात्र हॅशटॅग वापरताना अकमलने आयपीएल (IPL2016final) ऐवजी (PSL2016final) असं लिहिलं. पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपरलीगच्या उल्लेखामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवण्यात आली.

 

 


अकमलला हॅशटॅग वापरताना झालेली गफलत लक्षात येताच त्याने ट्वीट डिलीट केला आणि पुन्हा ट्वीट केलं. मात्र तोपर्यंत अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल केले होते.