मेस्सीच्या निवृत्तीवरून आफ्रिदी टार्गेट
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आफ्रिदीने निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु अद्याप त्याने निवृत्ती घेतली नाही. 36 वर्षीय आफ्रिदीने 27 कसोटी, 398 एकदिवसीय आणि 96 टी20 सामने खोळले आहेत.
कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा दणका बसल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून लियोनेल मेस्सीने निवृत्ती जाहीर केली. मेस्सीच्या निवृत्तीवरून सोशल मीडियावर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीवरून खिल्ली उडवण्यात आली.
मेस्सीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट चाहत्यांनी आफ्रिदीच्या निवृत्तीवरून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. आफ्रिदीने अनेकवेळा निवृत्तीची घोषणा केली, मात्र तो अद्यापही पाकिस्तान संघाकडून खेळत आहे.
पण आफ्रिदीच्या निवृत्तीवरून त्याला चाहत्यांनी चांगलेच टार्गेट केले.