पाऊले चालती, पंढरीची वाट...
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 03:54 PM (IST)
1
यावर्षी पालखी सोहळा प्रस्थानाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बबन लोणीकर, गिरीश बापट, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. मुनगंटीवारांनी फुगडी घालून आनंद व्यक्त केला
2
तुकोबारायाच्या मंदिरातून निघून पालखी आज इनामदार वाड्यात मुक्कामी असणार आहे. यंदा 330 दिंड्या तुकोबांच्या पालखीत सहभागी होणार आहेत.
3
तुकोबांनंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही उद्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.
4
आळंदीत शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत मोठी गर्दी होतेय.
5
विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आज देहूतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तुकोबांच्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.