Tokyo Olympics 2020 : टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी.व्ही  सिंधूने जपानच्या अकेन यामगुचीला 21-13, 22-20  ने पराभूत करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सिंधुची शानदार खेळी पाहता भारताची पदकाची अपेक्षा वाढली आहे. सिंधु जर सेमीफायनलमध्ये जिंकली तर देशासाठी आणखी एक पदक निश्चित आहे.






बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू कडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकत बॅडमिंटनमध्ये भारताला पहिल्या सुवर्ण ऑलिम्पिक आशा दाखवली. आता सिंधूचा सामना थायलंडच्या रतचानोक आणि चिनच्या ताई यु यिंग यांच्यामध्ये होणाऱ्या क्वार्टरफायनलमध्ये होणाऱ्या विजेत्याशी होणार आहे.


जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या यामागुची आणि सातव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधु या दोघांमधील सामना तब्बल 56 मिनिटे रंगला.  सिंधूने यामागुची विरुद्ध पहिला गेम फक्त 23 मिनिटात 21- 13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. दुसऱ्या सामन्यात 33 मिनिटात  यामागुचीवर मात करत पहिल्या चारमध्ये आपली जागा निश्चित केली.