कोलंबो : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वाईट काळातून जाणाऱ्या श्रीलंकन संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) उपुल थरंगाला वन डे आणि ट्वेण्टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं आहे. त्याच्याजागी अष्टपैलू थिरारा परेराकडे संघाचं नेतृत्त्व सोपवलं आहे.
उपुल थरंगाच्या नेतृत्त्वात श्रीलंकेची कामगिरी अतिशय वाईट आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात खेळलेल्या वन डे मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला 5-0 ने व्हाईटवॉश दिला होता. तर अक्टोबरमधील एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला पाकिस्तानकडून 0-5 अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
परेराला कर्णधार बनवण्याआधी निवडकर्त्यांनी अनेक नावावर विचार केला आणि अनके नावांबाबत चर्चा झाली. अखेर थिसारा परेराकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.
अँजेलो मॅथ्यूजलाही वन डे संघाचं कर्णधार बनवण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु तो सध्या दुखापतग्रस्त असून त्याने भारताविरुद्धच्या कसोटीत गोलंदाजीही केली नाही. दुखापतीमुळे संघातून बाहेर राहण्याची टांगती तलवार कायम त्याच्या डोक्यावर असते. त्यामुळे त्याला कर्णधारपद दिलं नाही.
थिसारा परेराने याआधी यूएई आणि पाकिस्तान दौऱ्यातील टी-20 मालिकेत श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्त्व केलं होतं. आता टीम इंडियाच्या कठीण आव्हानासाठी तो आता तयार आहे. परंतु हा दौरा त्याच्यासाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिला सामना 10 डिसेंबर रोजी धर्मशाळामध्ये खेळवण्यात येईल. तर 13 डिसेंबरला चंदीगडमध्ये दुसरा सामना आणि 17 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये तिसरा सामना खेळवण्यात येईल. वन डेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवण्यात येणार आहे.
उपुल थरंगाला हटवलं, थिसारा परेरा श्रीलंकेचा नवा कर्णधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2017 03:29 PM (IST)
परेराला कर्णधार बनवण्याआधी निवडकर्त्यांनी अनेक नावावर विचार केला आणि अनके नावांबाबत चर्चा झाली. अखेर थिसारा परेराकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -