मास्टर ब्लास्टरच्या एका 'शतका'ची 23 वर्षे
सचिनने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान विरूद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्यात त्याला खातंही उघडता आले नव्हते. पण नंतरच्या काळात क्रिकेटच्या सर्व प्लॅटफॉर्मवर त्याने आपल्या खेळीने क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिनने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक ऑस्ट्रेलिया विरूध्द झळकावले. त्याने या सामन्यात 130 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 110 धावा ठोकल्या.
भारतीय क्रिकेटमध्ये ज्याची परमेश्वराप्रमाणे पूजा केली जाते, त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्याच्या चाहत्यांमध्येही त्याच्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची चढा-ओढ असते.
सचिनच्या नावावर शतकांचे शतकाचा विक्रम नोंद आहे. मात्र, त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकवण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागली.
सचिनने 9 फेब्रुवारी 1994 रोजी सचिनने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले आहेत. 23 वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत सचिनने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात 100 शतके झळकावली. 2010 सालातील दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 200 धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -